dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| घरफाळा विभाग » जनरल टँक्स |
महाराष्ट्र शैक्षणिक कर,रोजगार हमी कर,निवासी कर,महाराष्ट्र शैक्षणिक कर, रोजगार हमी कर व निवासी कर असून त्याचे दर शासनाने ठरवून दिलेले आहेत.त्यानूसार सदरचे कर वसुल केले जातात.

करपात्र रक्कम निशि्चत करण्याचे अधिकारः मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ अनुसुची प्रकरण ८ कराधान नियम २०(क) नुसार करपात्र रक्कम निश्चित करण्याचे अधिकार मा.आयुक्तांकडे निहित आहेत.प्रचिलित कर पात्र रक्कम निश्चित करण्यासाठी आकारकवयाचे किमान मासिक भाड्याचे दर खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्र. इमारतीचा प्रकार १/४/१९९२पुर्वीच्या इमारतीसाठी १/४/१९९२ नंतरच्या इमारतीसाठी
    निवासी अनिवासी निवासी अनिवासी
१.

झोपडपट्टी

५रु.

१०रु.

८रु.

१५रु.

२.

दगड,विटा,माती,साधे कौलारु बांधकाम

१२रु.

२५रु.

१५रु.

३०रु.

३.

दगड,विटा,चुना मंगलोरी कौलारु बांधकाम

१५रु.

३०रु.

२०रु.

४०रु.

४.

लोड बेअरिंग

१७रु.

३५रु.

३०रु.

६०रु.

५.

आर.सी.सी.

२०रु.

४०रु.

३०रु.

६०रु.

६.

सुपर फाइन स्ट्रक्चर

२०रु.

४०रु.

३५रु.

७०रु.

७.

खुली जागा

०.०५पै.

०.१०पै.

०.०७पै.

०.१५पै.

वरील दर मालक,वापरातील मिळकतीसाठी अवलंबले जातात आणि कुळाचा वापर असल्यास रेडिरेकनच्या आधारे मासिक भाडे विचारात घेउन कर पत्रमूल्य निश्चित केले जाते.बँक वापरातील मिळकतीसाठी प्रत्त्यक्ष मिळणारे मासिक भाडे विचारात घेतले जाते. ज्या मिळकतीच्याबाबतीत न्यायालयीन निर्णय झाला आहे.त्या मिळकतीसाठी न्यायालयाने ठरविलेल्या दराप्रमाणे करपात्र मुल्य निश्चित केले जाते.

मिळकतीचे करपात्र मुल्य प्रथम निश्चित करताना जागेवर जाऊन बांधकामाचे क्षेत्रफळ,बांधकाम प्रकार, वापराचा प्रकार,भागवटदार, बांधकाम सुरू होण्याची तारीख,बांधकाम परवाना,भोगवटा प्रमाणपत्र, मालकी हक्कासंबधीची कागदपत्रे ,कुळ असल्यास भाड्याची माहिती संकलित केली जाते. व सदर उपलब्ध माहितीच्या आधारे फॉर्मवर माहिती नोंद करून अनुमानित/ प्राथमिक भाडे नमूद केले जाते. व महिन्याच्या भाड्यांच्या अनुपंगाने काही तक्रार असल्यास मिळकतदारांना नियम १५ (२) मधील तरतूदीमनुसार १५ दिवसांची नोटीस देण्यात येते व त्याचे म्हणणे ऐकून घेऊन मासिक भाडे व करपात्र मूल्य निश्चित करण्यात येते.

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ९९ प्रमाणे पुढील आर्थिक वर्षासाठी आकारणी करावयाचे कर,कोणत्या दराने आकारणी करावयाचे याचे अधिकार हे महासभेमध्ये निहीत आहेत. याप्रमाणे करपात्र रकमेनुसार सन २००५-०६ या आर्थिक वर्षासाठी निवासी वापरासाठी अमलात असलेले दर खालीलप्रमाणे
करपात्र रक्कम एकूण निवासी एकूण निवासी
१ ते १५०

३४.२५टक्के

४९.२५टक्के

१५१ ते २७०

३५.२५टक्के

५१.७५टक्के

२७१ ते ३००

३६.२५टक्के

५२.७५टक्के

३०१ ते ५४०

३७.२५टक्के

५५.२५टक्के

५४१ ते १३५०

३८.५०टक्के

५६.७५टक्के

१३५१ ते २१६०

४२.७५टक्केे

६१.५०टक्के

२१६१ ते ३०००

४४.७५टक्के

६१.००टक्के

४३२१ ते ६०००

४८.७५टक्के

७०.००टक्के

६००१ ते ६४८०

४९.७५टक्के

७२.५०टक्के

६४८१ ते १२९६०

५२.७५टक्के

७५.००टक्के

१२९६१ ते ४३२००

५५.००टक्के

८१.२५टक्के

८१००१ चे पुढे

६४.२५टक्के

८३.७५टक्के

 

रू ५४० पासून पुढे सर्व

रु ५०० प्रति मिळकत

हस्तांतराची नोटः नियम १(१) व १(२) अन्वये विहित केलेल्या मुदतीत न कळवल्यास प्रत्येक नोंदीसाठी रू.५० अतिरिक्त फी आकारण्यात येते. हस्तांतराच्या संबंधी द्यावयाच्या नोटीसेचा अर्ज येथील छापील नमुन्यात असून अर्जाची किंमत रू.५/- आहे.

हस्तांतरणामध्ये येणा-या अर्जामध्ये वारसाहक्काने हस्तांतरण व खरेदी किंवा अन्यप्रकारे दस्तऐवजद्वारे होणारे हस्तांतरण असे दोन प्रकार आहेत. यासाठी प्रॉपर्टी कार्ड,सात-बारा उतारा,झोपडपट्टीधारकासाठी झोपडपट्टी कार्ड, मिळकत शासन/महानगरपालिका यांच्या़ मालकीची असल्यास कब्जेपट्टी/भाडेपट्टी करार तसेच नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था असल्यास संस्थेचा ठराव व नाहरकत दाखला अशाप्रकारचे कागद हजर करवून घेवून येथील विहीत नमुन्यातील अर्जाप्रमाणे हस्तांतरीत करता येतात.

हस्तांतरण प्रक्रियेसाठी मिळकत धारकांच्यामध्ये असलेली उदासीनता घालविण्यासाठी ही प्रक्रिया अद्यावत करण्यासाठी ऑनलाईन म्युटेशन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये दुय्यम निर्बंधक कार्यालयामध्ये खरेदी/विक्री व्यवहार पूर्ण झाल्याबरोबर त्याच ठिकाणी हस्तांतरणासाठी नामांकन पत्र घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमध्ये नामांकन पत्र सादर झाल्यापासून दुस-याच दिवशी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन मिळकत धारकांना हस्तांतरण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी रू.५०/- प्रत मिळकत सर्व्हिस घेण्यात येणार आहेत.

शहर हद्दीमधील मिळकतीची कर आकारण्यासाठी माहिती संकलित करीत असताना स्वतः मालक वापराखेरीज अन्य व्यक्ती किंवा भाडेकरू असलेल्या मिळकतीच्या भाड्याबाबत मिळकतदाराकडून माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे, विसंगती वा चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आले आहे.एकाच विभागातील एकसारख्या असणा-या करपात्र मूल्य निश्चितीमधील तफावत ब-याच वेळेस तक्रारीसाठी कारणीभूत होते. तुलनात्मक दृष्ट्या चांगल्या भागात कमी भाडे यामुळे करामध्ये विसंगती निर्माण होते. त्यामुळे मिळकत आकारणीमध्ये सुसुत्रता येण्यासाठी त्या त्या विभागातील भाडेकरू वापरत असलेल्या मिळकतीची करपात्र रक्कम एकसारखी ठेवणयाकरीता विभागावर प्रति चौरस फुटास किमान मासिक भाड्याचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. यासाठी या परिसरातील राहणीमान व सोई-सुविधाचा विचार केला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक विभागाकडील रेकनरचा आधार घेतला असून विभागातील मिळकतीचे वार्षिक उत्पन्न दर्शविणा-या प्रचलित सुत्राप्रमाणे प्रत्येक विभागातील मासिक भाडे काढून त्याच्या फक्त २५ टक्के भाड्याचा विचार केला आहे. त्याचप्रमाणे या भागातील सर्व साधारणपणे प्रत्यक्षात घेतले जाणारे भाडे याचासुध्दा विचार करून रेडी रेकनर तयार केला आहे. सदरचा रेडी रेकनर हा फक्त भाडेकरू असणा-या मिळकतीसाठी कर आकारण्यास आधार म्हणून वापरला जातो.
  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation