dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| उदयान विभाग » झाडांचे तक्रारीबाबत |
झाडांचे तक्रारीबाबतः
यामध्ये मुख्यतः झाडांच्या फांद्या तोडणे,नागरिकांचे स्वतःचे झाड असेल तर ३ दिवसात झाडांच्या फांद्या तोडण्याबाबत परवानगी देण्यात येते.सदरचे झाड महानगरपालिकेचे असेल व त्याच्या फांद्याची तक्रार असेल तर साधारणपणे ७ दिवसांत काम करून दिले जाते.बांधकामासाठी झाड तोडण्याची गरज असेल तर,निवासी कामासाठी बांधकाम करावयाचे असेल तर, जागा पाहून ७ दिवसात परवानही दिली जाते.कमर्शिअल बांधकाम असेल तर रू.५००/-आकारणी केली जाते.जर विनापरवानगी झाड तोडले असल्यास निवासी बांधकामासाठी रू.१०० व कमर्शिअल बांधकामासाठी रू.५००/-ज्यादा ट्री ऑथोरिटी फंड घेतला जातो.नागरिकांनी समारंभासाठी कुंडीची मागणी केल्यास एका कुंडीस रू.३भाडे व रू.२०/-डिपॉझिट घेतली जाते.त्यानतर २ दिवसांच्या कालावधीमध्ये कुंड्या उपलब्ध करून दिल्या जातात.तसेच महानगरपालिकेच्या बागा विविध कारणांसाठी नागरिकांना खालील कारणांसाठी भाड्याने दिल्या जातात.
१. स्वागत समारंभ
२. शैक्षणिक चित्रकला स्पर्धा
३. धार्मिक कार्य
४. सांस्कृतिक कार्यक्रम
५. सिनेचित्रीकरण
योग्य भाडे व डिपॉझिट घेऊन २ दिवसांमध्ये बागेची परवानगी दिली जाते.
टीप :-
झाडे तोडण्याबाबत नवीन बांधकामासाठी असेल तर अर्जासोबत,मालकीबाबत प्रॉपर्टी कार्ड व बांधकाम परवाना झेरॉक्स प्रत व बांधकाम मंजूर नकाशा झेरॉक्स प्रत,त्यावर झाडे तोडायची आहेत ती झाडे दाखविणे ह्या सर्व गोष्टी आवश्यक आहेत.
  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation