dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| मालमत्ता विभाग » इस्टेट विभागाअंतर्गत समाविष्ट बाबी |
अ. क्र. कामाचा तपशील संख्या
१. मार्केटस. ४८
२. खुल्या जागा १३३९
३. मटण व फिश दुकान माळे १६९
४. केबिन्स २७३
५. इमारती ४२
६. कामगार चाळी २७
७. जिम्नॅशियम हॉल १३
८. जलतरण तलाव २
९. भाजी मार्केट १०
१०. सार्वजनिक वाहनतळ १३
११. गवत राने २५
महानगरपालिकेची एकूण ४८ मार्केटस असून या मार्केटमध्ये विविध क्षेत्राचे एकूण १९०७ गाळे आहेत. मनपाचे मार्केट पूर्ण झाल्यानंतर त्यामधील गाळे जाहिर प्रसिद्धीकरणाद्वारे निविदिका मागवून विविध व्यवसायांसाठी भाडे तत्वावर लागण केले जातात. यामुळे गाळा मिळण्याचे समान हक्क प्रत्येक नागरिकास मिळतात.

महानगरपालिका मार्केटमधील गाळे मागणीनुसार हस्तांतरित केले जातात.यासंबंधी हस्तांतर नजरणा फी आकारली जाते.यासाठी शहरातील मार्केटचे स्थान विचारात घेऊन त्याचे प्रमुख विभाग पाडण्यात आले आहेत.
विभाग क्र.१ मध्यवर्ती व्यापारी स्थान
कपिलतीर्थ मार्केट शिवाजी मार्केट,रा.शाहू क्लॉथ मार्ट,महात्मा गांधी मार्केट,लक्ष्मीपूरी
विभाग क्र.२ अंतरक्षेत्र व्यापारी स्थान
शाहुपूरी,राजारामपूरी,गावठाणमधील इतर मार्केट्स
विभाग क्र.३ शहरालगत असलेल्या उपनगरामध्ये असलेली मार्केट-
प्रतिभानगर,रूईकर कॉलनी,कसबा बावडा यांचा समावेश केला आहे.

या मार्केट गाळ्यांसाठी प्रचलित हस्तांतर दर खालीलप्रमाणे आहेत
विभाग क्र.१-१०० चौ.फूट अगर त्याच्या भागास रू.४५,५००/-
विभाग क्र.२-१०० चौ.फूट अगर त्याच्या भागास रू.३२,५००/-
विभाग क्र.३-१०० चौ.फूट अगर त्याच्या भागास रू.२६,०००/-
या व्यतिरिक्त मटन दुकाने व केबिन्स,भाडे तत्वावर लागण केलेल्या आहेत.सदर केबिन्स छोटे व्यवसाय करणा-या व्यवसायिकांना भाडेतत्वावर लागण केलेल्या आहेत.
  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation