| प्रेक्षणीय स्थळे » रंकाळा तलाव | |
 |
 |
कोल्हापूरच्या एतिहासिक, सांस्कृतिक तसेच सिने शुटींग साहित्यिक या सर्वांनाच हा तलाव एक प्रेरणास्थान तसेच अत्यंत जिव्हाळ्याचा
विषय आहे.या तलावासारखेच करवीर नगरीत बरेच तलाव होते परंतु कालांतराने ते नष्ट झाले.रंकाळा तलावाच्या काठी शालिनी
पँलेस तसेच आगाऊ परवानगीने शूटिंग बघण्याची सोय असलेला शांताकिरण स्टुडिओ आहे.हा तलाव आकाराने व प्रशस्त आहे. |
रंकाळा तलावात मध्यभागी रंकभैरवाचे मंदिर असून या तलावाखाली त्याचे सोन्याचे देऊळ आहे,अशी दंतकथा प्रचलित आहे.या
देवावरूनच या तलावाला रंकाळा हे नाव पडले.या तलावास दोन मोठे घाट आहेत.एक राजघाट व दुसरा मारठघाट, राजघाटावर
रंकाळा टॉवर असून त्याच्या समोरच शालिनी पॅलेस आहे.
रंकाळा चौपाटी हे करवीरवासियांचे एक अत्यंत आवडते ठिकाण आहे.सायंकाळच्या आल्हाददायक वातावरणात ही चौपाटी
पर्यटकांनी व नागरिकांनी गजबजलेली असते.रंकाळ्यात बोटिंग,लहान मुलांना खेळण्यासाठी बाग,घोडसवारी,खाद्यपदार्थांचे
स्टॉल यात पर्यटक हरवून जातात.
|
|
|