dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| प्रेक्षणीय स्थळे » पन्हाळा |
कोल्हापूर जिल्हयाच्या आणि शहराच्या वायव्येस असणारा पन्हाळा हा किल्ला शिव छत्रपतींचा आणि संभाजीराजांचा आवडता किल्ला, मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्ययनासाठी योणा-या पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या अनेक आठवणी इथे या किल्ल्याच्या छायेत वावरताना येतात.
आधुनिकदृष्टया थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे.कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे. या किल्ल्याची माहीती इ.स.पूर्व तिस-या शतकात मिळते. त्याची साक्ष पांडवदरा,पोहाळे येथील लेणी आजही देतात. त्यानंतर हा किल्ला नाग जमातीच्या ताब्यात होता. पण पराशर ऋषींच्या कर्तुत्वामुळे आणि नागांच्या कीर्तीमुळे वास पन्नागालय (पन्नग -सर्प, आलय-घर) असे नाव प्राप्त झाले. सातनाहन काळाचे अवशेष येथे राष्ट्रकृट,चालुक्य,शिलाहार,भोज,यादव यांनी राज्य केले व इ.स. १०५२ मध्ये आज जसा कील्ला आपणास दिसतो तो शिलाहार वंशी राजा भोज दुसरा याने बांधला. याचे पर्वीचे नाव ब्रह्मगिरी व नंतर मुसलमानी राजवटीत शहानबी दर्गपुढे शिवरायांच्या काळात पन्हाळा हे नामाभिधान पुन्हा ठेवले.
नंतर मुसलमानी राजवटी शहानबी दर्गपुढे शिवरायांच्या काळात पन्हाळा हे नामाभिधान पुन्हा ठेवले. किल्ला पन्हाळा प्रथम शिलाहार वंशी भोज राजा,शिलाहार नृसिंह याच्या कारकीर्दीत बांधण्यात आला. चालुक्य विक्रमादित्य पाचवा याच्या कालावधीत याची बहिण आक्कादेवी किशृकदृ,तुरूगिरी (तोरगल)व म्हसवड हिच राजधानी होती. हा किल्ला छत्रपतीं शिवरायांनी प्रथम तारीख २८ नोव्हेंबर १६५९ रोजी घेतला. नंतर पुन्हा विजापूर अदिलशहाच्या ताब्यात गेला. पण लगेच २ मार्च १६६४ रोजी शिवरायांनी घेतला.याचवेळी सिद्दी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला होता. याचवेळी शिवराय जोहरच्या हातावर तुरी देऊन विशाळगडी राजदिंडीतून गेले. बरोबर शिवाकाशीद (प्रती शिवाजी) व बाजीप्रभू होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रती शिवाजी बनून व बाजीप्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. पुढे इ.स. १७१० मध्ये पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली ती १७७२ पर्यंत येथेच होती. नंतर ती कोल्हापूरास रत्नाकर पंत दिवाण यांचे कारकीर्दीत गेली.पुढे १८८४ मध्ये हा किल्ला इंग्रंजांनी ताब्यात घेतला.तेव्हा प्रसिद्ध चार दरवाजा नेस्तनाबूत केला गेला. आज पन्हाळा हे हिलस्टेशन आहे. याच्या सर्वांगीण विकासाचे प्रयत्न महाराष्ट्र शासन,पन्हाळा नगरपालिका व नागरीक करीत आहेत. या पन्हाळ्यावर अनेक ऐतिहासिक वास्तू आणि ऐतिहासिक महापुरूषाच्या जीवनाशी निगडीत अवशेष अस्तित्वात आहेत.कविवर्य मोरोपंताचा जन्म येथेच झाला त्यांच्या जन्म जागी आज मोरेपंत वाचनालयाची आधुनिक वास्तु उभी आहे.त्यालगतच थोड्या अंतरावर पन्हाळ्याची प्रसिध्द चवदार पाण्याची कापूखांब नावाची विहीर,पुढे एतिहासिक काळातील महालक्ष्मी मंदीर आहे.भोवती जी सुंदर बाग आहे ती संध्या बाग (नेहरू उद्यान) त्यालगत हॉटेल रसना पर्यटकांच्या सेवेसाठी आहे.
आज ज्या वास्तुत नगरपालिका पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉईज हॉस्टेल आहे.ती वास्तु ती शिवछत्रपतींच्या स्नुषा महाराणी ताराबाई यांचा वाडा त्यासमोरचे हे शिवमंदीर छत्रपती शाहु महाराजांनी बांधल.यातील शिवछत्रपतींची अश्वारूढ प्रतिमा कागलचे श्री.सुतार यांनी बसविलेली आहे.ती १९९३ मध्ये वसविली आहे थोड्याशा अंतरावर सज्जा कोठीची इमारत पूर्वी या वास्तुचे नाव सदर ई महाल असे होते.या वास्तूत संभाजीराजांना पन्हाळा सुभ्याचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी ठेवले होते.तिथेच त्यांची आणि शिवाजी महाराजांची अंतिम भेट झाली.
बाजीप्रभू बुरूजाजवळून तबक बागेत जाताना वैशिष्ट्यपुर्ण असा वाघ दरावाजा लागतो या दरवाज्यावर टोपीधारक गणपती आहे.इथून नजीकच आहे राजदिंडी । याच मार्गाने शिवराय जोहाराच्या वेढ्याच्या वेळी पन्हाळ्यावर विशाळगडला गेले अगदी पश्चिमेला आहे पुसाटीचा बुरूज त्याच्या पैल दिसते ते मसाईचे पठार इ.स.पूर्व दुस-या शतकातील पांडवलेणी अथून सात
तीन दरवाजाची भव्य तीन मजली तिचे बांधकाम शिसे धालून केले आहे.त्यावर प्राचीन शिलालेख आहेत. दरवाजावरील नक्षीकाम भव्य आणि प्रेक्षमीय आहे.इ.स.१६७३ मध्ये कोंडाजी फर्जदने येथूनच हा किल्ला अवघ्या साठ माणसानिशी घेतला.तेव्हा याच दरवाजात सोन्याची फुले उधळून शिवरायांचे स्वागत झाले.या तीन दरवाजालगतचे गोपाळतीर्थ हे पर्यटकांच्या विसाव्याचे ठिकाण आहे.लगतची घुमटी ही दारूखान्याची इमारत.या तीन दरवाजा नजीकच तीन मजली अंधारखांब नावाची विहीर आहे.तळात पाणी,मध्यभागी पटापैल जाणारी चोरवाट,वरील भागात राहणेसाठी जागा आहे.वास्तूवर एक शिलालेख आहे.या इमारतीस श्रीनगर असेही नाव आहे.
पराशर गुहा,कालीबुरूज,रेडेघाटाची बाग,समोरचा पावनगडचा परिसर या परिसरात प्राचीन अवशेष आहेत.या गडावर साधोबाचे तळे हे प्राचीन काळी पराशर तीर्थ या नावाने ख्यात होते.लगतचे अवशेष दिसतात ते चार दरवाजाचे.तो दरवाजा इंग्रजांनी १८४४ साली गडकरांच्या बंडात पाडला.जवळच बादशहाच्या करमणूकीसाठी राहणा-या नायकिणींचे वास्तव्य असणारी नायकीणीचा सज्जा ही इमारत आहे.तेथे तीस नायकिणी राहत असत.कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांचे मंदीर,त्यासमोर जिजाबाई सरकार यांचे मंदीर व लगतच्या पटांगणात रामचंद्र पंत अमात्य व त्यांच्या पत्नीची अशी दोन समाध्या आहेत.त्या बरोबर रेडेमहाल ही इमारत आहे.त्या जनावरांची सोय येथे होती.सध्या तेथे जनता बाझार आहे.पन्हाळ्यावरील प्रसिध्द एतिहासिक ठिकाणांपैकी सोभाळे तलाव व त्या काठी सोमेश्वर मंदीर आहे.या सोमेश्वरास शिवरायांनी सैनिकाकरवी लाख सोन्याची फुले वाहिल्याची नोंद जयरापिण्डे या कवीच्या पर्णालपर्वत ग्रहण अख्यान या काव्यात आहे.
असा निसर्गरम्य पन्हाळा एतिहासिक तसेच पर्यटकांसाठी थंड हवेचे ठिकाण आहे.मध्यमवर्गीय प्रवाशांकरिता हे खास शासनाने ठेवलेले पर्यटन केंद्र आहे.तेथे सरकारने १२ हॉलिडे होम्स् बांधली असून ३ कॉचेजीस आहेत.पन्हाळा गडावर पावसाळ्यात जोराचा पाऊस धुके असले तरी ऑक्टोबर ते जुन पर्यंत अतिशय प्रसन्न वातावरण असते.असा पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्याच्या मर्मबंधातील ठेव आहे.
  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation