| प्रेक्षणीय स्थळे » श्री महालक्ष्मी मंदिर | |
 |
कोल्हापुरात सर्वोच्च स्थान कुणाला असेल तर या मातेला, महालक्ष्मीला व देवालयाला आहे.
हे श्रीमहालक्ष्मीचे देवालया न उभारले जाते तर आज कोल्हापुर शहरच दिसले नसते.
श्रीमहालक्ष्मीची आर्शीवादानेच श्री.शाहू छत्रपती व श्री.राजाराम महारांज्यांसारखे
सुपुत्र जन्माला येऊन या शहराची वाढ व विकासाकरिता त्यांनी प्रयत्न केले.आजच्या
शहराच्या सद्यस्थितीचा पाया श्री महालक्ष्मीच्या देवालयाने घातला.त्यांच्या वाढीस महारांजांचे
प्रयत्न कारणाभुत झाले.श्रीमहालक्ष्मीचे देवालय शहराच्या मध्यवस्तीत,जुन्या राजवाडयानजीक आहे.
भव्य व सुंदर हेमाडपंथी पद्तीचे हे देवालय प्राचीन शिल्प कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे या
देवालयाचा आकार ता-यासारखा असून ते दोन मजली आहे देवालयात श्रीमहालक्ष्मीखेरिज दक्षिणेला
महासरस्वती, उत्तरेला महाकाली वरच्या मजल्यावर गणतीच्या मुर्ती आहेत या देवालयाला असंख्य खांब
असून ते मोजता येत नाही असा भाविकांचा समज आहे. |
मुख्य देवालयालासमोर एक प्रवेश मंडप आहे याला गरुड मंडप असे म्हणतात.नवरात्रात येथे उस्तव साजरा केला जातो इतर वेळी
र्कीतन,प्रवचन,भजन,ग्रंथवाचन वा प्रदर्शनासाठी देखील याचा उपभोग केला जातो महालक्ष्मीच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी
असलेला मार्ग मंदिराच्या आतल्या बाजुसच असून अगदी वैशिष्टपुर्ण आहे. |
मुख्य देवालयालाच्या सुरवातीस प्रवेश करताना मुख्य मंडप लागतो. त्यांच्या दोन्ही बाजुला भिंतीवर भरत आणि शत्रुघ्ह यांच्या
सुंदर मुर्ती कोरलेल्या आहेत. पुढे गेल्यावर मणिमंडप लागतो.कलात्मक कोरीव काम आणि जय विजय द्वारपालांच्या मुर्ती
मनमोहक आहेत.मुळ स्थान म्हणजे देवीची स्थापना केलेली जागा सन १७२२ पर्यंत श्रीमहालक्ष्मी मुर्ती मुस्लिम हल्ल्यापासून
बचाव करण्याकरिता म्हणून सुमारे दोनशे वर्षे झाकून न ठेवण्यात आली होती.मुख्य देवालयालाच्या बाहेरिल बाजुस चौसष्ट नृत्य
करणा-या योगिनी व इतर कोरीवकाम केलेले दिसते.श्री महालक्ष्मीच्या देवालयाच्या भोवती आवारामध्ये सर्व बाजुंना अनेक
देवदेवतांच्चा मुर्ती आहेत. त्यामध्ये शेपशायी व नवगृह किंवा अष्टदिवाळ मंडप यांचा समावेश आहे.शेपशायीची मुर्ती तितकीशी
आकर्षक नसली तरी त्या समोरिल मंडपातील नाजुक व सुंदर कोरीव काम आणि जैन तीथॅकर पाहण्यासारखे आहे. नवग्रह मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्लपकलेचा उत्कृष्ट नमुना या व्यतिरिक्त देवालयालाच्या आवारातील लहान लहान मंदिरापैकी मुख्य म्हणजे
दतात्रय, हरिहरेश्नर, मुक्तेश्री, विठोबा, काशीविश्वेर, राम, राधाकृष्ण,शनी, तुळजाभवानी, महादेव इ.मंदिरे |
|
 |
श्रीमहालक्ष्मी देवालयालात येण्यासाठी चार प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी मुख्य
प्रवेशद्वार महाद्वार पश्चिमेला असून त्याच्यावर नगारखाना आहे. देवालयाच्या
उत्तरेला काशी व मणिकार्णिका ही दोन तीर्थे आहेत. आवारात बाजुला
दीपमाळांचा छोटा समुह असून दोन अधुनिक प्रकाराची पाण्याची कारंजी
आहेत. उत्तरेकडील प्रवेश द्वारावर एक मोठी घंटा वाजवलि जाते.
महाराष्ट्रातील काही महत्तवाच्या व मोठ्या घंटांमध्ये या घंटेचा समावेश होतो
या घंटेचा निनाद चार पाच मैलाच्या परिसरात घुमतो.
|
दर पौष महिन्यामध्ये सायं सुर्यकिरणोत्सव साजरा केला जातो या तीन दिवसाच्या उत्सवाचे वैशिष्टय म्हणजे सायंकाळी ठराविक
वेळ सुर्यकिरण हे मंदिरात शिरून श्रीमहालक्ष्मीचे मुखावर पडतात व काही वेळातच नाहीसे होतात.आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्य देवालय
व त्या समोरील गरूड मंडप दोन्ही मिळून महालक्ष्मीच्या मुर्तीसमोर सुमारे १५० आच्छादित बांधकाम आहे.
मंदिरासभोवती व पश्चिमेला अनेक घरे आहेत.या तीन दिवसाखेरीज वर्षात केव्हाही देवीच्या मुखावर सुर्यकिरणे पडत नाहीत.
|
|
|