dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| प्रेक्षणीय स्थळे » छत्रपती शहाजी वस्तू संग्रहालय |
या वाड्यातील छत्रपती श्री शहाजी महारांजाची ख्याती इतिहासप्रेमी रसिक, वाचक, पर्यटक, इतिहास भवन अशी होती. कोल्हापूरचे श्रध्दास्थान म्हणजे राजर्षी शाहू महारांज. यांच्या जन्मशताब्दी निमित्त सन १९४७ दि ३० जून रोजी श्रीमंत शहाजीराजांनी आपल्या संग्रहातील अनेक दुर्मिळ मौल्यवान वस्तूंचा संग्रह एकत्रित करून स्वतंत्र असे संग्रहालय उभे केले. हे संग्रहालय छत्रपती शहाजी संग्रहालय म्हणून सुपरिचीत आहे. संग्रहालयात राजर्षी शाहूमहारांजाच्या जीवनातील विविध प्रसंगांची आठवण म्हणून दुर्मिळ चित्रे, त्यांच्या वापरातील वस्तूं, अलंकार, मौल्यवान वस्तूं, राजचिन्हे, सोन्याच्या-चांदीच्या बहुमोल वस्तू, तलवारी, भाले, शिकारीतील अनेक दुर्मिळ हत्यारे पहावयास मिळतात. हत्तीवरील चांदीची अंबारी, हत्तीसाठी वापरले जाणारे दागिने, चांदीचा हौद, सोन्याच्या चौ-या, अब्दागिरी, पालखी, चांदीचे आसन, विविध प्रकारची शस्त्रास्त्रे, बंदुका, तोफा यासारख्या शेकडो वस्तू म्हणजे करवीर नगरीचा ज्वलंत इतिहास. या वाड्यात शाहू राजांनी शिकार केलेली अनेक बलाढय जनावरे भुशाने भरुन ठेवली आहेत. महाराजांचा दरबार, खुर्चीची मांडणी, दरबाराचे सभागृह, बैठक व्यवस्था, राजर्षी शाहूराजा या ख-या अर्थाने रयतेला लोकप्रेमी राजा असल्याच्या शेकडो आठवणी, छत्रपतींची वंशावळ, छत्रपतींची घराण्याची परंपरा, जुन्या ऐतिहासिक भव्य सोहळ्यांचे प्रदर्शन, राजर्षी शाहू राजांचे हस्ताक्षरातील अनेक पत्रव्यवहार, परदेशातून मिळालेल्या अनेक भेट वस्तू, पूर्विचा राजदरबार, परदेशी पाहुण्यांच्या भेटी, कुस्ती मैदानातील अनेक प्रसंग सारेच कांही या वस्तू संग्रहालयात पहावयास मिळेल. प्रत्येक पर्यटक हे वस्तू संग्रहालय पाहिले की धन्य व कृतार्थ होतो आणि छत्रपतींच्या जुन्या स्मृतींची आठवण करून आनंदअश्रुने पाणावून निरोप घेतो.

हे संग्रहालय संर्वासाठी खुले असून नाममात्र शुल्क घेउन पहायला मिळते. महालक्ष्मी मंदिरापासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावरील हे ठिकाण. सिटी बससाठी ही स्वतंत्र व्यवस्थाही आहे. नक्की बघावे असे इतिहासाचे साक्षीदार म्हणून नवा राजवाडा प्रसिद्ध स्थान आहे.
  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation