कोल्हापूर महानगरपालिका

मा.सौ.शोभा पंडितराव बोंद्रे
महापौर
कोल्हापूर महानगरपालिका

   कोल्हापूर महानगरपालिकेची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देणा-या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) आपले मनःपूर्वक स्वागत। आधुनिकतेचा ध्यास घेतलेल्या महानगरपालिकेचे माहिती-तंत्रज्ञानाच्या महामार्गावरील हे पाऊल अनिवार्य होते.विभागाचे खाते प्रमुख,कामाच्या निर्गतीचा कालावधी,संपर्क दूरध्वनी क्रमांक यांची विभागवार माहिती वेबसाईटवर आहे.महानगरपालिकेतील प्रत्येक विभागाची कार्यपध्दती,आवश्यक असणारी कागदपत्रे,संपर्क अधिकारी यांची माहिती नागरिकांना वेबसाईटवर उपलब्ध आहे.मुख्यत्वे महानगरपालिकेने सुधारित विकास आराखडा नकाशा या वेबसाईटवर नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे.

प्रत्येक विभागाचे खाते प्रमुख,कामाच्या निर्गतीचा कालावधी,संपर्क दूरध्वनी क्रमांक यांची विभागवार माहिती वेबसाईटवर आहे.महानगरपालिकेतील प्रत्येक विभागाची कार्यपध्दती,आवश्यक असणारी कागदपत्रे,संपर्क अधिकारी यांची माहिती नागरिकांना वेबसाईटवर उपलब्ध आहे.मुख्यत्वे महानगरपालिकेने सुधारित विकास आराखडा नकाशा या वेबसाईटवर नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे.सदर ई-मेलवरील तक्रारी या सामान्य लिखित स्वरूपाच्या तक्रारींप्रमाणे ग्राह्य धरून त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.त्यामुळे नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या कार्यालयांमधे येण्याची आवश्यकता भासणार नाही.

सदरची वेबसाईट स्थानिक,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी भाषेमध्ये प्रसिध्द होत असल्याने करवीर नगरीच्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.महानगरपालिकेचे नित्याच्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता यावी या अपेक्षेने वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे.महानगरपालिकेचे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य सार्थ होण्यासाठी नागरिकांनी सदर वेबसाईटवरील माहितीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे...।

  (मा.सौ.शोभा पंडितराव बोंद्रे)
महापौर
कोल्हापूर महानगरपालिका