dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| प्रेक्षणीय स्थळे »शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान|
कोल्हापूर हे शहर कुस्ती या खेळाबद्दल अखिल भारतात प्रसिद्ध आहे.श्री शाहू खासबाग मैदान हे या पेशातील लोकांचे मानाचे स्थान आहे.या खासबाग कुस्ती मैदानात आजपर्यंत अगणित लहान मोठ्या कुस्त्या खेळल्या गेल्या,असंख्य पैलवान या मातीत नावारूपाला आले आणि या मैदानाने करोडो लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.हे मैदान मंगळवार पेठेत असून राजवाड्यापासून चालत पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे.हे मैदान अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून अशा प्रकारचे मैदान क्वचितच असेल.
याचा आकार पूर्ण गोलाकृती असून मध्यभागी कुस्ती खेळण्याचा मोठा आखाडा आहे.या आखाड्यात एकाच वेळी चार ते पाच कुस्त्या केल्या जातात.सभोवताली प्रेक्षकांना बसण्यासाठी व व्यवस्थित कुस्ती पाहता यावी म्हणून उतरण आहे.या मुळे सर्व मैदानाचा आकार एखाद्या खोलगट तबकासारखा दिसतो.पूर्व व पश्चिम दिशांना प्रवेशाची सोय आहे.पूर्वेला निमंत्रित व मान्यवर व्यक्तीना बसणेकरिता मोठा मंच असून त्यावर मंडप उभारलेला आहे.या मंचाचा उपयोग रंगमंच म्हणून खुल्या नाट्यप्रयोगासाठी वा इतर कार्यक्रमासाठीही केला जातो. आखाड्याभोवती व प्रेक्षकांनी ठराविक अंतराच्या आत येऊ नये म्हणुन दोन वर्तुळकार लोखंडी कठ़डे तयार केलेले आहेत.या संपूर्ण मैदानात सुमारे २५ते ३० हजार लोक भारतीय बैठकीमध्ये बसू शकतात.मुख्य प्रवेशव्दार पूर्वेस असून त्यालगतच केशवराव भोसले नाट्यगृह आहे.
  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation