|
|
 |
|
|
|
|
| उदयान विभाग » उद्यानाविषयी अधिक माहीती | |
महानगरपालिकेची एकूण ५१ सार्वजनिक उद्याने आहेत.क्षेत्र साधारणपणे ९० एकर आहे.ट्रॅफीक आयलँड बगीचे १५ व शहरी
वने १३ आहेत.एक नवीन बगीचा विकसित करण्याचे काम चालू आहे.जुन्या बगिचांची जोपासना व नवीन बागांच्या
विकासाची कामे उद्यान विभागाकडे असतात.साधारणपणे वर्षाला ५०,००० नवीन झाडे शहरात लावण्यात येतात.१९७३
पासुन १९९९-२००० पर्यंत १ते१० लाख लावलेल्या झाडाचे संगोपन करण्यात आलेले आहे. पासुन १९९९-२००० पर्यंत १ते१० लाख लावलेल्या झाडाचे संगोपन करण्यात आलेले आहे. |
२६ सार्वजनिक उद्यानामध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी बसविण्यात आली आहेत.रंकाळा उद्यान,महावीर उद्यान,हुतात्मा पार्क,चिमासाहेब बाग
राजाराम हॉल बाग या बागांमध्ये आकर्षक नयनरम्य कारंजी तयार करण्यात आली आहेत.महानगरपालिकेचे उद्यान खाते ३ पोटविभागात विभागले आहे.
प्रत्येक विभागामध्ये २४ निवडणूक विभाग येतात.सदरच्या विभागात गार्डन सुप सुपरिटैंडेंट मिस्त्री,मुकादम,माळी,कामगार,वॉचमन,असा स्टाफ आहे.
सदरच्या विभागातील जुन्या भागांची देखभाल,नवीन बागांच्या विकासाची कामे,झाडे लावणे,त्यांचे संगोपन करणे,धोकादायक झाडे तोडणे,
वृक्षप्राधिकरणाची कामे करणे ही सर्व कामे पोटविभागात केली जातात.बागा खात्याकडून एकूण ३४२ कर्मचारी आहेत. |
 |
 |
शहरातील लहान मुलांना वाहतुकीचे शिक्षण देण्यासाठी ताराबाई पार्कमध्ये ट्रॅफीक पार्क निर्माण करण्यात
आले आहे.ट्रॅफीक सिग्नल बसविण्यात आलेले आहेत.लहान मुलांच्यासाठी सायकली ठेवण्यात आलेल्या आहेत.
आठवड्यातून एकदा ट्रॅफीक पोलिस येऊन मार्गदर्शन व प्रशिक्षण देतात. महावीर उद्यानामध्ये मुलांच्या मनोरंजनासाठी मत्स्यालय तयार करण्यात आले आहे.तेथे नवीन जातीचे
आकर्षक,रंगीत मासे ठेवण्यात आले आहेत.तसेच छोटा कबूतरखाना आहे.त्यामध्ये ४९ कबूतरे आहे.तसेच रंकाळा तलाव उद्यानामध्ये
वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची १६ बदके जोपासली आहेत.सिध्दाळा बागेमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र ३ खोल्यांमध्ये गोष्टींच्या
पुस्तकांची लायब्ररी व खेळणी संग्रहालय तयार करण्यात आले आहे.
|
नागाळा पार्कमध्ये वनौषधी वनस्पतींची स्वतंत्र लागवड करून वेगळा बगीचा करण्याचे काम चालू आहे.जेष्ठ नागरिकांसाठी
काही सुखसोयी लक्षात घेऊन कै.वासुदेव बळवंत फडके उद्यानामध्ये मुंबईच्या धरतीवर नाना-नानी पार्क करण्यात आलेले आहे.
|
|
|
|
|
|
|
|