dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| ई - गव्हर्नन्स |
शहरातील नागरीकांना महानगरपालिकेशी निगडीत असणा-या सेवा उपलब्ध करून देणे, सर्व स्तरावर माहिती उपलब्ध करून देणे तसेच सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे, मुख्यत्वे ह्या उद्देशाने कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ई - गव्हर्नन्स प्रकल्प राबविणेत येत आहे.

साधारणतः नागरिक महापालिकेत कर भरण्यासाठी वेगवेगळी प्रमाणपत्रे घेण्यासाठी अथवा अनुषंगिक मंजूरी मिळविण्यासाठी येत असतात ई - गव्हर्नन्स प्रकल्पामुळे या सर्व गोष्टी सोप्या पद्धतीने महापालिकेच्या कोणत्याही नागरिकांस अगदी जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध होतील. ई - गव्हर्नन्समुळे महापालिकेचे कामकाज सुलभ, पारदर्शक व जलद होईल. नागरीकांना त्यांच्या कराबद्दलच्या येणे बाकी लवकर कळवून महसूल लवकर व सोप्या रीतीने गोळा करता येईल.

संगणक व दळणवळण क्षेत्रातील विकसित तंत्रज्ञान वापरून महापालिकेचे माहिती केंद्र हे नागरी सुविधा केंद्राशी जोडलेले आहे. यासाठी लॅन (LAN ) वॅन (WAN) या प्रणालीचा वापर केला आहे तसेच इंटरनेटवर सदरची माहिती उपलब्ध आहे.

कोणताही नागरीक जगाच्या कोणत्याही ठिकाणी इंटरनेट या तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेच्या सेवा अथवा माहिती घेऊ शकतो. तसेच प्रशासक महापालिकेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवु शकतात व सदर माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेऊ शकतात.

  मुखपृष्ठ
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation