|
|
 |
|
|
|
|
| आपले कोल्हापूर |
|
कोल्हापुर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर असून प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने ते प्रसिध्द आहे. महालक्ष्मी मंदिर आणि
जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र म्हणुनही ओळखले जाते. तसेच ऐतिहासिकदृष्टया कोल्हापुर महत्वाचे शहर असून प्राचीन काळापासून ते विविध राजघराण्याचे राजधानीचे ठिकाण होते. शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणामुळे कोल्हापुरने नवा आदर्श निर्माण केला.
पन्हाळा किल्ला, दाजीपूर अभयारण्य, रंकाळा तलाव, यामुळे कोल्हापुरला पर्यटनदृष्टया महत्व आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक भाविक व पर्यटक
कोल्हापुरला भेट देतात. |
 |
कोल्हापुर शहर पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले आहे. कोकण, कर्नाटक व गोवा यांना जोडणारे ते महाराष्ट्रातील एक महत्तवाचे शहर आहे.
कोल्हापुर परिसरातील जमीन सुपीक असुन ऊस व तंबाखू सारखी नगदी पिके घेतली जातात. कोल्हापुरी गुळ, चप्पल, कोल्हापुरी साज सर्व
प्रसिध्द आहे.
कोल्हापुर हे कला, शिक्षण, उद्योग, खेळ व विशेषत कुस्तीसाठी प्रसिध्द आहे. कोल्हापुरमध्ये शिवाजी विद्यापीठ असून दक्षिण महाराष्ट्रातील
विद्यालये त्यांच्याशी संलग्न आहेत. कोल्हापुर जवळ शिरोली व गोकुळ शिरगाव येथे औद्योगिक वसाहती असून फाँन्ड्री उद्योगात कोल्हापुर
जगप्रसिध्द आहे.
कोल्हापुरच्या अधुनिक घडणीत अनेक विकास प्रकल्प हाती घेण्यात आले असून माहित तंत्रज्ञानाच्या कोल्हापुर महानगरपलिकेने अनेक
सोयी सुविधा देऊ केल्या आहेत. यामुळे कोल्हापुर सर्व क्षेत्रात प्रगतीची नवी शिखरे गाठणारे आहे. |
कोल्हापूर शहराविषयी माहिती - एखादे शहर ऐतीहासिक, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक वा राजकीय
क्षेत्रामध्ये प्रगत व उन्नत होते त्यावेळी त्या शहराची सुरूवात व इतीहास
जाणून घेण्याची जिज्ञासा नारिकांना व प्रवाशांना न वाटली तर नवल.
प्रत्येकाला आपल्या शहराच्या पूर्वइतिहासाबद्दल औत्सुक असते परंतु ज्ञान
असतेच असे नाही. कारण शहराच्या इतिहास व ऐतिहासिक घटना एकत्रित
केलेल्या फार क्वचितच आढळतात. म्हणून या ठिकाणी कोल्हापूर शहराचा
इतिहास थोडक्यात फार खोलात न जाता दिलेला आहे. |
|
|
|
|
|
|
|
|